Tuesday 5 July 2022

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम 15 जुलैपर्यंत पूर्ण करावेत ‍ – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड वृक्ष लागवडीचे उदिष्टही वेळेत पूर्ण करावे

 



 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

                विविध लोकोपयोगी उपक्रम 15 जुलैपर्यंत पूर्ण करावेत ‍                                                                        

                                 – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही वेळेत पूर्ण करावे

 

जालना, दि. 5 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 75 दिवस राबविण्यात येणारे विविध लोकोपयोगी उपक्रम दि. 15 जुलै 2022 पर्यंत पूर्ण करावेत. तसेच वृक्ष लागवडीचे उद्दिष्टेही वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी विभागप्रमुखांना दिले.

मिशन 75 दिवस आणि वृक्ष लागवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी शर्मीला भोसले आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे महत्त्वपूर्ण वर्ष आहे. या निमित्ताने वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या महोत्सवाचा एक भाग म्हणून मिशन 75 दिवस हे अभियान मे-2022 या महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत दि. 15 जुलै 2022 पर्यंत सर्व विभागांना विकासात्मक कामांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.  ज्या विभागांना विकासात्मक कामांचे उद्दिष्ट देण्यात आले, त्यांनी 15 जुलैपर्यंत कामे पूर्ण करुन अहवाल सादर करावा.

शिक्षण, वन, कृषी, रोहयो, राष्ट्रीय महामार्ग,  आरोग्य, क्रीडा, पाणीपुरवठा, जिल्हा उदयोग केंद्र, रेशीम, महिला व बालविकास, बांधकाम विभाग, जलसंधारण, नगरपालिका प्रमुख, तहसिलदार यांच्याकडून  केलेल्या व प्रलंबित कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले. यानंतर वृक्ष लागवडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हयाला यंदा 82 लक्ष 55 हजार 600 वृक्ष लागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. 

वृक्ष लागवडीबाबत सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जालना जिल्हा हरित करण्यासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.  प्रामुख्याने वन विभाग, कृषी, रेशीम, बांधकाम या विभागांना वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय इतर ज्या विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्यांनी तातडीने आपले उदिष्ट पूर्ण करावे. या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करु नये. ज्या विभागांकडे वृक्ष लागवडीसाठी जागा  उपलब्ध नाही, त्यांनी कुंडलिका-सीना नदीच्या परिसरात किंवा पारशी टेकडी येथे वृक्ष लागवड करावी. 

-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment