Friday 15 July 2022

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवासाठी लाऊडस्पीकर वापरासाठी सुट

 


 

                जालना, दि. 15 (जिमाका):- केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमण व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम (5) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतुगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्हयाच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहिर करण्यासाठी संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने प्राधिकृत केले आहे.

                श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तांकडुन मोठया प्रमाणात साजरी केल्या जात असून भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मध्यरात्री साजरा केल्या जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवासाठी मध्यरात्री पर्यंत लाऊडस्पीकर वापरासाठी सुट देणे बाबत व संपूर्ण वर्षभरासाठी लाऊडस्पीकर वापरासाठी सुट असलेल्या 15 दिवसामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला दिनांक 19 ऑगस्ट, 2022 रोजी सुट देण्याबाबत प्राप्त विनंती अर्जानुसार जालना जिल्हयात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी, ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत करण्यास जिल्हाधिकारी, जालना यांनी एका आदेशाद्वारे सुट दिली आहे.

                या उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतची सूट जिल्हयातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व ध्वनी प्रदुषण प्राधिकरण यांची राहणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment