Thursday 28 July 2022

अनूसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात मोफत प्रवेश सुरू

 


जालना दि. 28 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग मार्फत अनूसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंर्तगत येणा-या औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या चार जिल्हयातील 14 वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी - विद्यार्थीनींना तालुका स्तरावर इयत्ता 8 वी पासून पुढील प्रवेशाकरिता व जिल्हा स्तरावर इयत्ता 11 वी पासून नंतरच्या शिक्षणाकरीता शासकीय वसतिगृह प्रवेश योजना पात्र विद्यार्थ्यांकरिता शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

   सन 2022 -2023 करिता पालकाचे घोषणापत्र व विद्याथ्र्यांचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना खालील लिकंमध्ये देण्यात आलेल्या सुचनांची खबरदारी घेण्यात यावी https://drive.google.com /file/d/1u WMTN0 ARcXZZ15 qqUaokCL3U RmfqU6e/view?usp=sharing

      वसतिगृह प्रवेशासाठी संकेत सुरू करण्यात आलेले असुन विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. तथा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहात प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद) देवकन्या बोकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलेआहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment