Thursday 7 July 2022

पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड



जालना दि. 7 (जिमाका) :- जालना जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये  कप ॲड कॅप मॉडेल (80 : 110) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये ही योजना एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. सदर योजना ही शासन निर्णयानुसार अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकासाठीच असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग नोंदविणे ऐच्छिक आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी विमा हप्ता हा 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये तूर, मुग, उडीद, बाजरी, मका, कापूस व सोयाबीन ही पिके विविध महसूल मंडळामध्ये अधिसूचित करण्यात आलेली आहेत. सदर योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबी अंतर्गत विमा संरक्षण आहे.

बाजरी पिकासाठी  विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर  24 हजार रुपये असून शेतकरी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर 480 रुपये आहे. सोयाबीनसाठी संरक्षित रक्कम 55 हजार रुपये,  विमा हप्ता 1 हजार 100 रुपये, मुग संरक्षित रक्कम 20 हजार रुपये,विमा हप्ता 400 रुपये, उडीद संरक्षित रक्कम 20 हजार रुपये,  विमा हप्ता 400 रुपये, तुर साठी संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा हप्ता 700 रुपये, कापुस संरक्षित रक्कम 52 हजार रुपये, विमा हप्ता 2 हजार 600 रुपये तर मका पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये, शेतकरी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर 600 रुपये असेल.

योजनेमध्ये भाग घेऊ इच्छिणारे शेतकरी महा ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र, बँक, वैयक्तिक पीकविमा भरू शकतात. सदरील योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याचा अंतिम दि. 31 जुलै 2022असून अधिक माहितीसाठी या योजनेचा शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  सर्व शेतकऱ्यांनी शेवटी होणारी गर्दी लक्षात घेता आताच आपला सहभाग निश्चित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे आणि यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


No comments:

Post a Comment