Tuesday 12 July 2022

जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस सुरूवात

 






जालना दि. 12 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेस दि. 12 जुलै 2022 रोजी सुरूवात झाली असून या स्पर्धा 14 वर्षेआतील मुले व 17 वर्षेआतील मुले व मुली या गटात संपन्न होत असून आज दि. 12 जुलै 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जालना च्या मैदानावर सकाळी 10.00 वाजता भास्कर आबा दानवे, उपसभापती, कृषी उत्पन्न समिती, जालना यांच्या शुभहस्ते उदघाटन झाले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा फुटबॉल असोशिएशनचे उपाध्यक्ष फेरोजअली व संघटनेचे पदाधिकारी मुस्ताक सिद्दिकी, शिवाजी घात्रणे, अर्जुन गेही, सचिव,औद्योगिक महासंघ, जालना, पुजा रोटोमॅक प्रा.लि.चे संचालक भगवान पाडले, प्रमोद खरात, मोईज सिद्दिकी, शेख चाँद, अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना व संघटनेचे पंच, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक खेळाडू आदी उपस्थित होते.

     स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भास्कर आबा दानवे, उपसभापती यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन विभागस्तर व राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे घेण्यात यावे, यास संपुर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर पुजा रोटोमॅक प्रा.लि.चे संचालक भगवान पाडले यांनी सदर स्पर्धेत विजयी व उपविजयी खेळाडू संघास स्मृतीचिन्ह देत असल्याचे शुभेच्छापर भाषणात सांगितले.

     कोरोना 19 नंतर प्रथमच जिल्हास्तर स्पर्धेला सुरूवात होत असून खेळाडूंनी खेळाडूंवृत्तीने खेळून आपल्या जिल्हयाचे नाव लौकीक होईल असे अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांनी  खेळाडूंना शुभेच्छा देतांना मनोगत व्यक्त केले.

जिल्हयातील 17 वर्षेआतील मुलीच्या एकुण 7 संघ, 14 वर्षेआतील मुले 8 संघानी सहभाग नोंदविला आहे.

 

 

 

17 वर्षेआतील मुली सामन्याचे निकाल :

 पोद्दार हायस्कुल, जालना विजयी विरूध्द एम आर डी ए स्कुल, जालना (स्कोअर 3-0),ऋषी विद्या स्कुल जालना विजयी विरूध्द सेंट मेरी स्कुल, जालना (स्कोअर 1-0),सेट जॉन हायस्कुल, जालना विजयी विरूध्द  अनिल जिंदल स्कुल, जालना (स्कोअर 1-0)

  14 वर्षेआतील मुले सामन्याचे निकाल :

  ऑक्सफर्ड इंग्लीश स्कुल जालना विजयी विरूध्द सेंट जॉन हायस्कुल, जालना (स्कोअर 4-0)

  सदर 14 वर्षेआतील सामन्यात शेख रय्यान शेख जावेद यांनी 02 गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

 

     सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून इम्रान सिदिकी, शेख ईस्माईल, सय्यद सुलतान, शेख कैफ, सुमीत, शेख सैफ, मलिक पठाण आदी काम पाहत आहे.

            जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022-23 यशस्वी करण्यासाठी महमंद शेख, फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयेाजन होत आहे. सदर स्पर्धेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन महमंद शेख, फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संतोष वाबळे, क्रीडा मार्गदर्शक, सोपान शिंदे, हारूण खान, सिमोन निर्मळ इत्यादी परिश्रम घेत आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.                                                         

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment