Wednesday 6 July 2022

शासकीय कार्यालयांची आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती आज्ञावलीमध्ये ऑनलाईन नोंदवावी जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांचे आवाहन


 

जालना दि. 6 (जिमाका) :- नियोजन विभागाच्या शासन परिपत्रकानूसार कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2022 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना मार्फत सुरू करण्यात आले असुन शासन परिपत्रकानूसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दि.1 जुलै 2022 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे बंधनकारक आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahasdb.maharashtra.gov.in/CGE या लिंकवर जावून अधिकारी व कर्मचारी यांची महिती अद्ययावत करावयाची आहे. ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर-2022 देय माहे डिसेंबर-2022 ची वेतनदेयके कोषागार कार्यालयाकडुन स्वीकारण्यात येणार नाहीत याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घेण्याचे तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतनदेयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-*-

 


No comments:

Post a Comment