Wednesday 13 July 2022

"आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत सुरुमगाव येथे 81 हजार रोपांची वृक्षलागवड

 


     जालना दि. 13 (जिमाका) :-   दि. 14 जुलै 2022 रोजी मौ. सुरुमगाव ता. परतूर येथे "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली 81 हजार रोपांची वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना प्रत्येकी 1 हजार  वृक्षलागवडीचे उदि्दष्ट देण्यात आलेले होते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे आणि घनवन निर्माण करण्याच्या उद्देशाने 81 हजार  रोपांची वृक्षलागवड करण्यात येणार असून त्यापैकी 75 हजार रोपांची एकाच ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

 

या मोहिमेत स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), इतर खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, इतर अधिकारी , कर्मचारी संघटना, शिक्षक व विदयार्थी यांची उपस्थिती राहणार असून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून मोहिम यशस्वी करावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment