Wednesday 13 July 2022

जागतिक युवा कौशल्य दिनी कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा

 


               

          जालना दि. 13 (जिमाका) :-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना  आणि जेईएस कॉलेज जालना यांचे संयुक्त विद्यमाने दि. 15 जुलै, 2022 शुक्रवार रोजी  जे. ई. एस कॉलेज जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून  कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा  आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यात एसएससी पास व नापास, एचएससी, आयटीआय, ग्रॅज्युएट्‌स, बी.एस.सी. ॲग्री, इंजिनिअर्स  यांचेसाठी एकूण  806 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 13 कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, यांची प्रमुख उपस्थितीती व मार्गदर्शनाने होणार आहे. तसेच, स्वयंरोजगाराबाबत विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे  जन-जागरण करण्यात येणार असून स्वयंरोजगारविषयक जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती करूणा खरात  आणि कौशल्य विषयक जेईएस कॉलेजचे माजी प्राचार्य तथा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा यांचे मार्गदर्शन होणार आहे.

 

        या रोजगार मेळाव्यामध्ये  जालना येथील दिव्या एस.आर.जे. फुडस,जालना यांची 228 पदे, लक्ष्मी कॉटस्पिन लिमिटेड, सामनगाव, जालना यांची  एकुण 25 पदे, जालना येथील भुवन व्हील्स प्रा.लि. यांचेकडे 11 पदे, टॅलेंसेतु सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांची  40 पदे, सफल सिड्स आणि बायोटेक लिमिटेड, जालना यांची 5 पदे, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पुणे यांची 30 पदे,महिद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेड, चाकण, पुणे यांची अप्रेंटिस 45 पदे, बडवे इंजिनीरिंग लिमिटेड, औरंगाबाद यांची अप्रेंटिस 30 पदे,  अंबरीश ट्रॅक्टर, मस्तगढ़ जालना यांची 16 पदे,  धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लि. एमआयडीसी शेंद्रा, औरंगाबाद यांची ईपीपी,अप्रेंटीशिप ट्रेनी 200 पदे,  देवाअश्व होडा ॲटोमोबाईल जालना यांची 25 पदे, टामॅटिक्स  ग्लोबल सर्व्हिसेस लि, नाशिक यांची ईपीपी ट्रेनि 100 पदे, नवभारत फर्टिलाईजर, औरंगाबाद यांची 51 पदे अशी एकूण ८06 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 13 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड भरती करणार आहेत.

 

                      या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार  इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत रिझ्युम,बायोडाटा  आणि  शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित हावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर  क्लिक करुन जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा - 2 (2022-23)   या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अ‍ॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप  क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा. या मेळाव्यास नोकरी इच्छूक उमेदवारांनी  उपस्थित राहुन  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment