Wednesday 20 July 2022

जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

 


            जालना, दि. 20 (जिमाका) :-  राज्य निवडणूक आयोगाच्या दि.18 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 करीता गट व गण निहाय प्रारुप मतदार यादी दिनांक 20 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही प्रारूप मतदार यादी पहाण्यासाठी सबंधित तहसिल कार्यालय येथे उपलब्ध असुन यासंदर्भात दिनांक 25 जुलै, 2022 पर्यंत हरकती व सुचना संबंधित तहसिल कार्यालयात दाखल करता येतील, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment