Monday 11 July 2022

रोजगार मेळाव्याचे दि. 15 जुलै ‍ रोजी आयोजन

 


 

        जालना दि. 11 (जिमाका) :-    जिल्हा कौशल्य विकास, जगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना  यांचेमार्फत दिनांक   15 जुलै, 2022, शुक्रवार रोजी  जे. ई. एस कॉलेज जालना येथे सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित  कौशल्य स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा - 2 (2022-23)    आयोजित करण्यात आला आहे. यासाठी 453  रिक्तपदे उपलब्ध झाली आहेत.

 

       शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या आणि महास्वयम्‌ वेबपोर्टलवर नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा आयोजीत करण्यात येत आहे. या मेळाव्यात रोजगार देणाया विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहे. तसेच, स्वंयरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असुन कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

        

            या  सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास WWW rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी.

भरती इच्छुक नियोक्त यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे WWW rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर  जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा - 2 (2022-23)   यामध्ये भरण्यात यावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, संपत चाटे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment