Friday 22 July 2022

श्री गजानन महाराज संस्थान शेगाव पालखीमुळे वाहतुकीच्या मार्गात बदल


 

जालना दि. 22 (जिमाका) :-  श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची  श्रीची पालखी पायदळवारी पालखी, परंपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन या दिंडीमध्ये 1 हजार ते 1 हजार 500  वारकरी सहभागी आहेत. पायी दिंडी ही दि.22 जुलै 2022 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असुन दि. 22 जुलै 2022 रोजी ते दि. 24 जुलै 2022 पर्यंत गोंदी  व अंबड हद्दीत मुक्कामी राहुन दि. 24 जुलै 2022 रोजी गोलापांगरी मार्गे जालना शहराकडे प्रयाण करणार आहे.

            दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन अवजड वाहनांच्या रहदारीमुळे शुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या  व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.

   महाराष्ट्र पोलीस अधिनियम  1951 ची कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक  डॉ. अक्षय शिंदे यांना प्राप्त अधिकारान्वये  शहागड ते अंबड रोडवरील येणारी व जाणारी अवजड वाहनांना दि. 22 जुलै 2022 रोजी ते 24 जुलै  2022 रोजी दररोज  दुपारी 3.00 ते  रात्री 11.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेशीत केले आहे.

            दि. 22 जुलै 2022 शुक्रवार रोजी सकाळी 8.00 वाजेपासुन ते  रात्री 11.00 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी अवजड वाहने थांबवून ही वाहने पाचोड-अंबड मार्गे जालनाकडे जातील व जालनाकडुन शहागडकडे जाणारी वाहने अंबड- पाचोडमार्गे शहागडकडे जातील.

            दि. 23 जुलै 2022 शनिवार रोजी सकाळी 3.00 वाजेपासून  रात्री 11.00 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहने थांबवून, पाचोड-जामखेड फाटा – जामखेड  - किनगाव  चौफुली –बदनापुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडून येणारी वाहने बदनापूर- किनगाव चौफुली – पाचोड मार्गे शहागडकडे जातील.

            शहापुर ते शहागड व अंबड ते पाचोड मार्गावरील गावातील अवजड वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच पारनेर फाटा ते औरंगाबाद हायवे पर्यंतच्या गावातील अवजड वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

   दि. 24 जुलै 2022 रविवार रोजी सकाळी 3.00 वाजेपासुन ते रात्री 11.00 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करुन, ही वाहने वडीगोद्री- पाचोड –जामखेड फाटा – किनगाव चौफुली – बदनापुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडुन येणारी वाहने बदनापूर- किनगाव चौफुली – जामखेड – जामखेड फाटा – पाचोड मार्गे शहागडकडे जातील.

             तसेच अंबडकडुन जालनाकडे जाणारी अवजड वाहने   सकाळी 3.00 ते  रात्री 11.00 वाजेदरम्यान बंद करुन ही वाहने किनगाव चौफुली – बदनापुर मार्गे जालनाकडे जातील व जालनाकडून अंबडकडे येणारी अवजड वाहने बदनापुर- किनगाव चौफुली –जामखेड – पाचोड मार्गे शहागडकडे जातील

            दि. 23 जुलै 2022 ते दि. 24 जुलै 2022 रोजी जालनाकडुन घनसावंगीकडे  जाणारी वाहने, रोहनवाडी – सुतगिरणी मार्गे घनसावंगीकडे जातील व घनसावंगीकडुन जालनाकडे  जाणारी वाहने त्याच मार्गे जालनाकडे जातील. घनसावंगी कडून बीडकडे जाणारी वाहने तिर्थपुरी – गोंदी –शहागड मार्गे बीडकडे जातील.

            वरील मार्गाची जड वाहतुक दि. 22 जुलै 2022 रोजी ते दि. 24 जुलै 2022 रोजी पर्यंत दररोज  सकाळी 3.00 ते  रात्री 11.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी.

            हा आदेश दि. 22 जुलै 2022 रोजी ते दि. 24 जुलै 2022 रोजी पर्यंत दररोज 3.00 ते 11.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी.

            हा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी  जारी केला आहे.

-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment