Thursday 7 July 2022

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

 


जालना दि. 7 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हयातील अनुसुचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित युवागटांतील महिला-पुरुषांकरिता निःशुल्क 1 महिना कालावधीच्या अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकीय प्रेरणा, उद्योजकीय गुणसंपदा, विविध संधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, उद्योगाला आवश्यक विविध परवाने, शासकीय व निमशासकीय विविध कर्ज योजना, खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, बाजारपेठ पाहाणी प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेची कर्ज प्रक्रिया, उद्योगांना भेटी, सिध्दीप्रेरणा प्रशिक्षण, इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच प्रशिक्षण पश्चात उद्योग सुरू करण्यासाठी हॅन्ड होल्डिंग सपोर्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केला जाईल.

सदरील प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीकडे जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत असणे गरजेचे असून उमेदवार हा 18 ते 45 या वयोगटातील असावा.

इच्छुकांनी सदरील कार्यक्रमांच्या अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरिता जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, टी.सी. व पासपोर्ट साईज फोटोसह इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहिती साठी दि. 12 जुलै 2022 पुर्वी सुरेखा मोरे कार्यक्रम आयोजक, मो. 9545258681 किंवा भारती सोसे-पांढरकर, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, जालना फोन नं. 02482-220592 येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकरी, बार्टी, मुंजाजी कांबळे, व  विभागीय अधिकारी डी. यु. थावरे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment