Friday 1 July 2022

जालना जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

 



 

जालना दि.1 (जिमाका):-  तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असून तंबाखूचे सेवन हे कँसर या आजाराला निमंत्रण आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनमानसात जागृती करत

शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह सर्व कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांनी मौखिक तपासणी करुन तंबाखुचा त्याग करावा. जालना जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

  राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाबाबत  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बैठकीस  मुख्य कार्यकारी अधिकारी  मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ए.व्ही. भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्हि. बी. खतगावकर, एडीएचओ डॉ. गजानन म्हस्के, पोलीस उप अधीक्षक संजय व्यास, अन्न सुरक्षा अधिकारी  पी. एस. अजठेकर, शिक्षणाधिकारी  कैलास दातखिळ, श्रीमती मंगल धुपे, उपमुख्याधिकारी न.पा. महेश शिंदे, वैदयकिय अधिकारी, डॉ. जी. व्ही. काळे,  सोनाजी भुतेकर, श्रीमती. सुनंदा कोरडे आदींची उपस्थीती होती.

 जिल्हाधिकारी डॉ.राठोड म्हणाले की, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. नऊ निकषांप्रमाणे शाळा तंबाखुमुक्त असणे आवश्यक असून शाळा  परिसरामध्ये तंबाखुजन्य पदार्थ यांची विक्री व सेवन होवु नये याची खात्री करण्यात यावी.शिक्षक, विदयार्थी यांची मुख आरोग्य तपासणी नियमित करावी. तसेच जिल्हयातील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नियमित मौखीक आरोग्य तपासणी करावी व आपले कार्यालय तंबाखुमुक्त राहील याची खात्री करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

   यावेळी  जिल्हा सल्लागार डॉ. संदीप गोरे यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन, एचआयव्ही आदींचाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

    बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment