Monday 11 July 2022

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

 


जालना दि. 11 (जिमाका) :- साहित्यरत्न  लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात मातंग समाज व तत्सम 12 पोटजातील विदयार्थी ,विदयार्थींनी यांना 10 वी 12 वी पदवी,पदव्युतर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा विदयार्थी,विदयार्थींनी महामंडाळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या आधिन राहुन अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती  योजने अंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

ईच्छुक विदयार्थी, विदयार्थींनीना महामंडळाच्या जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे दि. 21 जुलै 2022 पर्यंत अर्ज करावे

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे –अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.) अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पनाचा दाखला (तहसिलदार यांच्याकडुन घेतलेला असावा) रेशन कार्ड ,आधार कार्ड, झेरॉक्स प्रत ,गुणपत्रक , दोन पासपोर्ट साईज फोटो बोनाफाईट,पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पुरावा ,फोटो .

            असे  आवाहन जिल्हा व्यवस्थापक विकास कुंटुरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले  आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment