Wednesday 20 July 2022

विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी निवड गोल्डन ज्युबली,सेंट मेरी हायस्कुल मुलांत तर मुली मध्ये पोद्दार हायस्कुल अव्वल

 






जालना दि. 20 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेमध्ये गोल्डन ज्युबली हायस्कुल 17 वर्षे आतील मुले, सेंट मेरी हास्कुल 14 वर्षे आतील मुले तर पोद्दार हायस्कुल 17 वर्षेआतील मुली विजयी झालेल्या आहेत.

या स्पर्धा 14 वर्षेआतील मुले व 17 वर्षेआतील मुले व मुली या गटात झाल्या  असून स्पर्धामध्ये एकुण 26 संघानी जालना जिल्हयातून सहभाग घेतला होता. स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे संपन्न झाल्या असून स्पर्धासाठी विजयी व उपविजयी संघाना स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. सर्व ट्रॉफी पुजा रोटोमॅक प्रा.लि.चे संचालक भगवान पाडले, यांनी प्रायोजकत्व स्विकारून खेळाडूंना दिल्या आहे.

बक्षीस वितरणासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा फुटबॉल असोशिएशनचे उपाध्यक्ष फेरोजअली व संघटनेचे पदाधिकारी मुस्ताक सिद्दिकी, शिवाजी घात्रणे,  पुजा रोटोमॅक प्रा.लि.चे सभासद रत्नाकर पाडले, शेख चाँद, क्रीडा संघटक, अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना व संघटनेचे पंच, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक खेळाडू आदी उपस्थित होते.

                   औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा जालना येथे दिनांक 26 जुलै 2022 पासुन सुरु होणार आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून इम्रान सिदिकी, शेख ईस्माईल, सय्यद सुलतान, शेख कैफ, सुमीत, शेख सैफ, मलिक पठाण आदी काम पाहीले आहे.

जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022-23 यशस्वी करण्यासाठी महमंद शेख, फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयेाजन झाले आहे. सदर स्पर्धेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन महमंद शेख, फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील महेश खर्डेकर,संतोष वाबळे, क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती रेखा परदेशी क्रीडा अधिकारी, सोपान शिंदे, हारूण खान, सिमोन निर्मळ व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील फुटबॉल खेळाडु यांनी परिश्रम घेतले आहे.

                        जिल्हास्तर स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे

14 वर्षेआतील मुले सामना :

सेंट मेरी हायस्कुल जालना विजयी ऑक्सफर्ड इंग्लीश स्कुल, जालना (स्कोअर 2-0)

17वर्षेआतील मुले सामना :

गोल्डन ज्युबली स्कुल जालना विजयी विरूध्द र्रि‍शि स्कुल, जालना (स्कोअर 4-2)

17 वर्षेआतील मुली सामना :

पोद्दार हायस्कुल, जालना विजयी विरूध्द सेट मेरी हाय, जालना,  (स्कोअर 6-6)

वरील माहिती  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

-*-*-*-*-*-*-    

No comments:

Post a Comment