Monday 11 July 2022

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याच्या वाटपासाठी दि. 13 ते 29 जुलै दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 11 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करण्याची योजना आहे. दि.13 फेब्रुवारी 2008 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जातीतील (अनु.क्र. 11) या प्रवर्गातील, गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल (100% अनुदानावर) वाटप योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळुन) सन 2022-23 साठी लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जालना या कार्यालयात दिनांक 13 ते 29 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत परीपुर्ण व स्वसाक्षांकित करून सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

लाभार्थ्यांनी अर्जासोबत अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, चालु आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराने निर्गमित केलेला), अर्जदाराचे अथवा कुटुंबाचे रेशनकार्ड (साक्षांकित प्रत), गटई कामाचे प्रमाणपत्र/अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामसेवक/तहसिलदार/मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, जागा नाहरकत प्रमाणपत्र. (ग्रामसेवक/तहसीलदार/मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड/मतदान कार्ड आदी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक असुन मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नसल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment