Monday 25 July 2022

श्री गजानन महाराज पालखीमुळे वाहतुकीच्या मार्गात बदल

 



 

जालना दि. 25 (जिमाका) :- श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी, पंरपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन दिंडी मध्ये 1 हजार ते 1 हजार 500 वारकरी सहभागी आहेत. सदर पायी दिंडीने 24 जुलै 2022 रोजी जालना शहरात प्रवेश केला  दिनांक 26 जुलै 2022 रोजी नाव्हामार्गे सिंदखेड राजा, जि. बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे.

 

 दिंडीचे दर्शन घेण्याकरिता मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36अन्वये पोलीस अधीक्षक  डॉ. अक्षय शिंदे यांना प्राप्त अधिकारान्वये  जालना, जालना शहरात येणारी व जाणारी अवजड वाहनांना दिनांक 26  जुलै 2022 रोजी  सकाळी 4.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंतखालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेशीत केले आहे.

 

जालना ते नाव्हा मार्गे सिंदखेडराजा - नागपुर कडे जाणारी जड वाहतुक जालना येथुन नाव्हा मार्गे न जाता कन्हैयानगर चौफुली-देऊळगाव राजा चिखली मार्गे नागपुरकडे जाईल. देऊळगाव राजा वरून येणारी जड वाहने अंबड, मंठाकडे जाण्यासाठी भोकरदन नाका, औरंगाबाद चौफुली, अंबड चौफुली मार्गे बायपासने जातील.

मंठाकडुन देऊळगाव राजाकडे जाणारे अवजड वाहने अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, भोकरदन नाका, कन्हैयानगर मार्गे बायपासने जातील.

वरिल मार्गाचे अवजड वाहतुकीमध्ये दिनांक 26 जुलै 2022 व दिनांक 27 जुलै 2022 रोजीचे सकाळी 4.00 ते संध्याकाळी 7.00  वाजेपर्यंत  बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी.

हा आदेश दिनांक 27 जुलै 2022 रोजीचे संध्याकाळी 7.00  वाजेपर्यंत अंमलात राहिल. हा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी  जारी केला आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 


No comments:

Post a Comment