Friday 22 July 2022

शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर

 


 

                      जालना दि. 22 (जिमाका) :-  भारत निवडणूक आयोगाने पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार यादी तयार करण्याबाबत सुधारित सर्वसमावेशक दिलेल्या सुचनेनुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत. तसेच दि. 1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक व अमरावती विभागातील पदवीधर व औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागातील शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असुन तो खालील प्रमाणे आहे.

            शनिवार दि. 1 ऑक्टोबर, 2022 - मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक, शनिवार दि. 15 ऑक्टोबर,2022 - मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी, मंगळवार दि. 25 ऑक्टोबर, 2022- मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिद्धी, सोमवार दि. 7 नोव्हेंबर, 2022 नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक, शनिवार दि. 19 नोव्हेंबर, 2022 हस्तलिखिते तयार करणे व  प्रारुप मतदार याद्यांची छपाई, बुधवार दि. 23 नोव्हेंबर, 2022 प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी, बुधवार दि. 23 नोव्हेंबर ते शुक्रवार दि. 9 डिसेंबर, 2022 दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, रविवार दि. 25 डिसेंबर, 2022 दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे व शुक्रवार दि. 30 डिसेंबर, 2022- मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment