Monday 25 July 2022

मॅराथॉन बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत प्रलंबित कामे गतीने मार्गी लावा

 




            जालना, दि.25 (जिमाका) :-  आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत जिल्ह्यात विविध विभागांच्या समन्वयाने विकास कामांचे नियोजन करण्यात येऊन अनेक कामे पुर्ण करण्यात आली आहेत.  या महोत्सवांतर्गत प्रलंबित असलेली कामे गतीने मार्गी लावावीत. तसेच जालना जिल्हा प्रदुषणमुक्त होऊन जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट येत्या               15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याबरोबरच झालेल्या कामांची माहिती छायाचित्रासह उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आझादी का अमृत महोत्सव, जलशक्ती अभियान, वृक्ष लागवड, अमृत सरोवर, अटल भुजल योजना या विषयांची मॅराथॉन बैठक जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी घेतली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, आझादी का अमृत महोत्सवांतर्गत जालना जिल्ह्यात विविध विभागांच्या समन्वयाने विकास कामे करण्यासाठी नियोजन करण्यात येऊन प्रत्येक विभागांना कामांचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात आले आहे.  जिल्ह्यातील शाळांमध्ये पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण, रोपवाटीका तयार करणे, सीडबॉल्स तयार करणे, विद्यार्थ्यांच्या डोळयांची तपासणी डिजिटल लायब्ररी, डिजिटल क्लास रुम  आदी संबंधित विभागांनी पुर्ण प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात. 

            पर्यावरणाच्यादृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाची असलेल्या वृक्ष लागवडीमध्ये 750 एकरवर वृक्षांची लागवड, फळबाग लागवड, महामार्गलगत 75 किलोमीटर वृक्षांची लागवड, हरितटेकडी तयार करणे, 750 वनराई बंधारे तसेच 7.5 लक्ष बांबूच्या वृक्षाची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  ही कामे पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठाडे यांनी यावेळी दिल्या.

            75 हजार शोषखड्डे, जनावरांसाठी 75 हौद, 75 हजार मे. टन गाळ काढणे, 75 जलस्त्रोतांचे पुर्नभरण, 7 हजार 500 पाण्याचे नमूने घेणे, 75 किलोमीटर पाणी पुरवठा पाईपलाईन उभारणी, सुंदर माझे गाव योजना, 750 शासकीय इमारतीवर रेनवॉटर हार्व्हेस्टींग, 75 जलसंधारणाची कामे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीरे यासह इतर नियोजित कामे गतीने मार्गी लावण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

            पावसाळयामध्ये वृक्ष लागवडीचे दरवर्षी उद्दिष्ट देण्यात येते.  यावर्षात जालना जिल्ह्याला 82 लक्ष 55 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असुन 89 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.  प्रत्येक विभागांनी त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले.

            यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलशक्ती अभियान अमृत सरोवर, अटल भुजल योजना या विषयांचाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

            बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment