Monday 18 July 2022

सहाकार न्यायालयात दि. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 


 

   जालना दि. 18 (जिमाका) :-  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेमार्फत दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सहकार न्यायालय, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँका, नागरी,ग्रामीण सहकारी पतसंस्था, हौसींग फायनान्स कार्पोरेशन यांच्याकडील Pre – litigation टप्प्यांवरील दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

      जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँका, नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, हौसींग फायनान्स कार्पोरेशन यांच्याकडील Pre – litigation टप्प्यांवरील दावे न्यायालयात लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यात येणर असून वरील प्रमाणे टप्प्यांवरील दावे संस्थांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना  यांच्या कार्यालयात लवकर दाखल करावेत.जेणकरुन या दाव्यांची माहिती न्यायालयास सादर करता येईल अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment