Monday 8 April 2024

उष्माघातापासून विद्यार्थ्यांच्या बचावासाठी शाळा-महाविद्यालय प्रमुखांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सूचना

 


 जालना, दि. 8 (जिमाका) :-  जालना जिल्हयामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमान 40 अंशच्या वर जात आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांना परिपत्रकाव्दारे उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परिपत्रकाव्दारे दिलेल्या सुचनेनुसार जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांनी  शालेय परिपाठ सकाळी कमीत कमी वेळेत व राष्ट्रगीत / प्रतिज्ञा पूरेतो मर्यादीत ठेवावे. परिपाठ शक्यतो सावलीच्या ठिकाणी घेण्यात यावा.  शाळेची वेळ वर्गखोल्याचे योग्य नियोजन करुन सकाळच्या सत्रात मध्यान्हापूर्वी ठेवण्यात यावी. शालेय विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ, खेळाच्या तासीका, पि.टी./ कवायत इ. उन्हाच्या कालावधीत आयोजीत करण्यात येवू नये.  शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोचाराची सुविधा शाळा व्यवस्थापनाने उपलब्ध करुन द्यावी. जे विद्यार्थी, स्कुलबस अथवा इतर वाहनांनी शाळेत ये-जा करतात त्यांच्या व त्यांच्या पालकांसाठी वाहन येईपर्यंत थांबण्यासाठी शाळेच्या आवारात शेड/सावलीची व्यवस्था करावी. वाढते तापमान लक्षात घेता शाळेच्या दर्शनी भागात/स्कुलबसमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा बाबतचे क्रमांक ठळक अक्षरात प्रदर्शीत करावे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी स्कुलबस द्वारे ये-जा करतात अशा सर्व स्कुलबसमध्ये चालकासोबत एक मदतनीस ठेवण्यात यावा.  शालेय कालावधीदरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता कोणताही विद्यार्थी, शिक्षक अथवा कर्मचारी यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात.  याव्यतिरिक्त उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असतील अशा उपययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात.

-*-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बोलक्या बाहुल्याने केली सादरीकरणातून मतदारांची जनजागृती

 




 

जालना, दि. 8 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी निवडणूक कार्यक्रमातंर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर कार्यक्रम परतूर येथील शिक्षक जय ढोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात सादर केला. बोलक्या बाहुल्याने मतदारांचे प्रतिनिधीत्व करत मनात उपस्थित होणाऱ्या शंका विचारुन समाधान करुन घेतले. ईव्हीएम विषयी माहिती, नोटा या नकारात्मक मतदानाविषयी  तसेच कुठल्याही अमिषाला बळी न पडता पारदर्शकपणे आपले बहुमुल्य मतदान करण्याविषयीची माहिती उपस्थितांना सादरीकरणातून देण्यात आली. कार्यक्रमाचा समारोपात बोलक्या बाहुल्याने ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ या घोषणेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

सोनदेव येथील फुड पॉयझनिंग नियंत्रणात

 


 


 

जालना, दि. 8 (जिमाका) :- प्राथमिक आरोग्य केंद्र शेवली अंतर्गत सोनदेव येथील हरिनाम सप्ताह व एकादशी निमित्त दि. 5 एप्रिल 2024 रोजी प्रसाद म्हणुन भगर खाल्ल्‌यामुळे उलट्या, मळमळीची लक्षणे 188 व्यक्तींमध्ये फुड पॉयझनिंग झाले असल्याचे प्राथमिकता दिसून आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. शाम राठोड व आरोग्य पथकाने 188 व्यक्तींवर तात्काळ औषधोपचार केले. सदरील व्यक्तींना सलाईन, ओ.आर.एस. व टॅब पीसीएमचा औषधोपचार देण्यात आला. सध्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच दि. 6 एप्रिल 2024 रोजी जिल्हास्तरीय पथकाने भेट देऊन सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. या पथकामध्ये साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.एन.जी.पवार, व आरोग्य विस्तार अधिकारी श्री. रसाळ यांचा समावेश होता.  सध्या परिस्थिती पुर्ण नियंत्रणात आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

 


जालना, दि. 8 (जिमाका) :- टंचाईशी निगडीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02482-223132 आणि 1077 असा आहे.

जालना जिल्हयात सन 2023-24 व 2024-25 अंतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे जिल्हयातील जनतेकडून टंचाईशी निगडीत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या  गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी विषय प्रकरणी दूरध्वनीव्दारे किंवा प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रारी / निवेदने यांचे निरसन टंचाई नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळविले आहे.

***

उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्या..! काय करावे…! काय करु नये..! सूचनाचे करा पालन

 


जालना, दि. 8 (जिमाका) – सध्या उन्हाळा सुरु आहे.  तापमानात वाढ झाली आहे, अशा वातावरणात उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडल्यावर पुरेसे उपचार व काळजी न घेतल्यास  मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्म वातावरणात होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने खालीलप्रमाणे सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे  आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोहम वायाळ यांनी केले आहे.

काय करावे -- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादीमुळे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणकरीता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करु नये--  लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावित. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.  उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

                                                              -*-*-*-*-*-*-

Friday 5 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 





जालना, दि. 5 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामाकाजाचा आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. विष्णुकांत आणि निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी सदर  निवडणूक निरीक्षकांची निवड केली आहे.

घनसावंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, दीपक पाटील आदींसह निवडणुकीशी संबंधित विविध कामकाजाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला म्हणाले की, निवडणूक भयमुक्त व सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे. कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण द्यावे.  निवडणुकीत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती करावी. मतदार व निवडणुक कामाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा अवश्य द्याव्यात.

निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. विष्णुकांत यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात अधिक दक्ष राहावे. तर निवडणूक  निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा  यांनी निवडणूकीशी संबंधित खर्चाचे अहवाल अद्यावत ठेवावेत. वेळेवर संबधित नोडल अधिकाऱ्यांकडून खर्च अहवाल प्राप्त करुन घ्यावेत, अशा सूचना केल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादरणीकरणाव्दारे परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या, मतदान केंद्र व तेथे मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा, मनुष्यबळ, वाहन सुविधा, चेकपोस्ट, भरारी पथके, प्रतिबंधात्मक कार्यवाया, साहित्य व्यवस्थापन, स्वीप अंतर्गत मतदानाविषयी करण्यात आलेली जनजागृती याबाबत सविस्तर माहिती दिली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी  निवडणूक व सणाच्या अनुषंगाने करण्यात आलेले पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच अवैध कारवाया रोखण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी स्वीप अंतर्गत मतदानाबाबत जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

                                                                    -*-*-*-*-*-        

Saturday 23 March 2024

दुय्यम निबंधक कार्यालय आजपासून सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु


 

जालना, दि. 23 (जिमाका) :- दरवर्षी 1 एप्रिलला बाजार मुल्य दरतक्ते प्रसिध्द होत असल्याने मार्च महिन्यात सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोदंणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच अर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पुर्ण करण्याच्या दृष्ट्रीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्कं (अभय योजना) या संबधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोदंणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकांराची गर्दी वाढत आहे, त्यामुळे पक्षकांराच्या सोयीसाठी जालना जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 23 मार्च व 24 मार्च तसेच दि.29 मार्च ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्गं.1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday 22 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ निवडणूक कालावधीमध्ये जात/धर्म/भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) - मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे जात / भाषा / धार्मिक शिबीरांचे / मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात कुठेही पारंपारीक सण, उत्सव, रुढीनुसार चालत आलेले धार्मीक कार्यक्रम वगळून लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजीत केलेल्या व ज्यामधुन मतदान, मतदार याच्यांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव पडेल असा कोणताही कार्यक्रम तसेच राजकीय पक्षाचा प्रचार प्रसिध्दी होईल अशा स्वरुपाचे कोणतेही जात/ भाषा / धार्मिक शिबीरांचे/मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत,  असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

***

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 






जालना, दि.22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

 

वैशिष्ट्य

            सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

 

वापर कसा करायचा

           एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

 

अचूक कृती व देखरेख

            या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

 

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

 

तातडीने होते कारवाई

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

 

डाटा सुरक्षा

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

 

-*-*-*-*-

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिक छापतांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी यांनी निर्बंध घातले आहे. यामध्ये इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे,  आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे, आदि नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दि. 6 जुन 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्‍ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 

-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना  जिल्‍हयात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटर गाड्या/वाहने यांचा समावेश नसावा.तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्‍यक्‍ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्‍यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.  याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार एकतर्फी आदेश जिल्‍हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्‍ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूकीचे कालावधीत जालना जिल्ह‌यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा, तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वादय वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आला  असल्याचे आदेश दि. 16 मार्च 2024 रोजीचे 6 वाजेपासुन ते दि. 6 जून 2024 चे रात्रीचे 12 वाजेपर्यंत संपूर्ण जालना जिल्ह्यात अंमलात राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

Thursday 21 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्‍यावर निर्बंध

 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 मार्च 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

                                                       -*-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध

 


जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाद्वारे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 प्रचारासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यासाठी नियमांचे पालन करावे

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. त्यासाठी  जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144अन्वये खालील प्रमाणे निर्बंध घातले आहेत.

फिरत्या वाहनांवर पक्षप्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंडो स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून  2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहनचालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्याबाजुने लावण्यात यावा, ईतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांनी  निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) अंमलात राहतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्‍त्‍यावर रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्‍यासाठी निर्बंध जारी

 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅर्नस, पॉम्‍प्‍लेट्स, कटआऊट्स, होर्डीग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आदेशाव्दारे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1)(डीबी) अन्वये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 खाजगी व्‍यक्‍तीच्‍या जागेवर / सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्‍तीपत्रके लावण्‍यास निर्बंध

 

                                  

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना  जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाच्‍या परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मोटार गाडया/वाहनांचा ताफ्याचा वापर करण्‍यास निर्बंध

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या / वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिले आहेत, त्याअर्थी जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध लागू

 

 

जालना, दि.21 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालणे आवश्यक आहेत. तरी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानूसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.  सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10  वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात  ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या  आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.  सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीत घेतलेल्या  परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे  बंधनकारक राहील. ध्‍वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्‍या वाहनावर बसविलेले असोत, त्‍यांचा सकाळी 6 वाजेपूर्वी किंवा रात्री 10 वाजेनंतर  आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय करण्‍यात येऊ नये. संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक सभा आणि मिरवणुकांमध्‍येही ध्‍वनीवर्धकाचा वापर करण्‍यात येऊ नये. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जुन 2024)अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-