Tuesday 19 July 2022

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा

 


 

        जालना दि. 19 (जिमाका) :- कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प, पैठण यांनी दिलेल्या संदेशानुसार   दि. 18 जुलै 2022  रोजी प्रकल्पासाठी जलाशय पाणीपातळी  462.342 मीटर जीवंत साठा 1605.785  दलघमी, जीवंत साठा टक्केवारी 73.97 टक्के असुन जायकवाडी प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता व पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे आरओएस परिचलन सुचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात धरणाच्या गेटमधुन, सांडव्याद्वारे गोदावरी गावांना नदीमध्ये पुरपाणी सोडावे लागणार असल्याने गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांनी सतर्कता बाळगावी म्हणुन संबंधीत गावांना सावधानतेचा इशारा  देण्यात आला आहे.

नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता, चिजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविणेबाबत व पुरापासून सावध रहावे. धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पूर विसर्गाबाबत व सदरील इशाऱ्याचे गांर्भीय लक्षात घेता नागरीकांच्या जिवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य व प्रतिबंधात्मक उपायायोजना करण्याबाबत उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदारांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एका आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment