Tuesday 12 July 2022

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत लोकसंख्या दिन साजरा


 

      जालना दि. 12 (जिमाका) :-   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून दि. 11 जुलै 2022 रोजी जागतिक लोकसंख्या दिवसा निमित्त जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर आर. अहिर,  तसेच प्रमुख पाहुणे ॲड जे.एस. भुतेकर व ॲड महेश धन्नावत हे उपस्थित होते.

    ॲड जे.एस.भुतेकर व ॲड महेश धन्नावत यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्या संबंधित मार्गदर्शन केले. तसेच आर. आर. अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक एन.बी. गोरे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले अशी माहिती सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

-*-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment