Friday 8 July 2022

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 चे कलम 16 अंतर्गत कारवाई

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :- महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांचे कार्यालयाकडे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील गैरअर्जदाराचे विरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार  कारवाई करण्यात आली.

प्राप्त तक्रारीनुसार अर्जदार अर्जुन भिमराव गिराम, रा. सिंधीकाळेगाव ता. जि. जालना यांनी मौजे सिंधी काळेगाव शिवारातील गट नं. 141 मधील 2 आर शेतजमीन गहाण ठेवून रु. 15 लाख व्याजाने घेतल्याने, गैरअर्जदार प्रकाश रामराव गोरे, रा. छत्रपती पेट्रोल पंपाजवळ, सिंधीकाळेगाव ता. जि.जालना यांचे विरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. सदर गैरअर्जदारांचे विरुद्ध झडतीची कार्यवाही पथक प्रमुख, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पी. बी. वरखडे, यांनी पुर्ण केली. पथक प्रमुख यांनी एकुण 33 दस्तावेज अवैध सावकारी तक्रारी संबंधाने झडती मध्ये जप्त केले.

गैरअर्जदार यांचे राहते घरी खरेदीखत, करारनामा, हिशोबाच्या वहया, कच्च्या नोंदी असलेली संबधीत कागदपत्रे असे महत्वपुर्ण दस्तावेज जप्त केले आहेत. सदर कार्यवाही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना नानासाहेब चव्हाण यांचे अधिपत्याखाली पथक प्रमुख सहायक निबंधक, सहकारी संस्था, पी. बी. वरखडे,  यांनी पुर्ण केली. या झडती कामी अधिकारी, कर्मचारी, सरकारी पंच व पोलिस कर्मचारी अशी एकुण 11 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

वरील प्रमाणे पथक प्रमुख यांनी कामकाज केले असुन झडतीमध्ये जप्त केलेल्या दस्तांच्या चौकशीचे काम सुरु आहे. सदर कार्यवाही जिल्हाधिकारी, व पोलिस अधिक्षक,यांचे मार्गदर्शनाखाली सहकार, महसुल व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने दिनांक 8 जुलै 202 रोजी पुर्ण करण्यात आली.

      अशी माहिती जिल्हा निबंधक (सावकारी), तथा जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, नानासाहेब चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment