Wednesday 26 July 2023

जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

 

 

जालना दि.26 (जिमाका) :-   महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये जालना जिल्हयात दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान महसूल दिन व महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे, इ. कामे वेळेत व वेळापत्रकानुसार करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा तसेच महसूली वसुलीचे उद्दीष्ट पार करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करणे तसेच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून जिल्हयात साजरा करण्यात येत आहे.

 

महसूल विभागाकडून देण्यात येणा-या विविध शासकीय सेवा आणि विभागाकडुन राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरीकांना अधिकाधिक माहिती होण्यासाठी व त्यांचा योग्य लाभ घेता यावा यासाठी तसेच याबाबत नागरीकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरीकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम दि.1 ऑगस्ट 2023  या महसूल दिना पासुन 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.

 

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतजिल्ह्यातील उपविभागीयस्तर/तालुकास्तरावरविशेष मोहिम/कार्यक्रम/शिबीर/महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी महसूल विभागाशी संबंधित कामकाजाचा आपापल्या तालुक्यातील शिबीराच्या माध्यमातुन लाभ घ्यावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment