Thursday 13 July 2023

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या नूतन कार्यालयात मॉडेल करिअर सेंटरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 

 

जालना दि. 14 (जिमाका) :- प्रशासकीय इमारतीत असणारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या नूतन कार्यालयात  केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. दि.13 जुलै रोजी  जिल्हाधिकारी डॉ.  विजय राठोड यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. सर्व सोईंनी सज्ज असलेल्या या सेंटरचे  जिल्हाधिकारी यांनी यावेळी कौतुक केले.

या  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उप-आयुक्त  सु. द. सैंदाणे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी. कांडलीकर,   उपअभियंता सी. एन. नागरे,  विद्युत विभागाचे उपअभियंता जे. एम. काळे, वास्तुविशारद जगदीश नागरे, शाखा अभियंता बी. टी. मंडलीक, शाखा अभियंता राहुल सुळ, जिल्हा नियोजन अधिकारी  सु. तू. सूर्यवंशी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. शेख पर्यवेक्षक नागेश सोनुने आदी उपस्थित होते.

मॉडेल करिअर सेंटरबाबत माहिती देताना श्री. चाटे म्हणाले की,  केंद्र शासनामार्फत सेंटरमध्ये लवकरच एका तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. मॉडेल करिअर सेंटर मार्फत जिल्ह्यातील युवक युवतींसाठी विविध स्तरावर (जिल्हा/तालुका/साळा-महाविद्यालये) प्रत्येक महिन्यात विविध विषयावर व्याख्याने, चर्चा, व्यक्तीमत्त्व विकास, स्वतंत्र व्यवसाय मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येतील. उमेदवारांची क्षमता व अभाव चाचणी आणि आवड कल चाचणी घेतली जाईल व त्यांना समुपदेशन करण्यात येईल. उमेदवारांचे कौशल्य वाढीसाठी ईमेल, एमएस वर्ल्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.

            हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सुरेश बहुरे, देवीदास मिसाळ, सुरेश शेळके, कैलास काळे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, सोमेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment