Tuesday 11 July 2023

जालना शहरात 14 ते 16 जुलैपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल

 

जालना दि.11 (जिमाका) :- श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळ वारी पंरपरेनूसार ही पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. दिंडी दि. 14 ते  15 जुलैपर्यंत जालना शहरात मुक्कामी राहून दि. 16 जुलै रोजी जालना-नाव्हा मार्गे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये राज्य महामार्ग क्रमांक 753 सी वरील जालना-नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था कन्हैया नगर जालना मार्गे देऊळगाव  राजा- चिखली या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी.  असे आदेश अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी जारी केले आहेत.

श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळ वारी पंरपरेनूसार ही पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असून दिंडीमध्ये जवळपास 700-800 वारकरी सहभागी आहेत. पायी दिंडी ही दि. 12 जुलै 2023 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असून दि. 14 ते  15 जुलैपर्यंत जालना शहरात मुक्कामी राहुन दि. 16 जुलै रोजी जालना-नाव्हा मार्गे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे. ही पायी दिंडी बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी जालना-नाव्हा-सिंदखेड राजा महामार्ग क्र. 753 सी वर मार्गक्रमण करणार आहे.

 दिंडीचे दर्शन घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन जड वाहनांच्या रहदारी मुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक, जालना राज्य महामार्ग क्रमांक 753 सी वरील जालना-नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 14 जुलै रोजीचे 5 वाजेपासून ते दि. 16 जुलै 2023 रोजीचे रात्रीचे 24 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पारीत करीत आहे. सध्याचा प्रचलीत मार्गावरुन म्हणजेच अंबड चौफुली, मंठा चौफुली, कन्हैयानगर बायपास जालना- नाव्हा- सिंदखेड राजा मार्गे सुलतानपुर- मेहकर कडे जाणारी वाहतुक ही पर्यायी मार्ग कन्हैया नगर जालना मार्गे देऊळगाव राजा- चिखली याक्रमाने वळविण्यात आली आहे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment