Tuesday 11 July 2023

श्री गजानन महाराज दिंडीसाठी वाहतुक मार्गात बदल; 12 ते 14 जुलै दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा

 

 

जालना दि.11 (जिमाका) :- श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी, पंरपरेनुसार पंढरपुर येथून परतीच्या मार्गावर असुन सदर दिंडी मध्ये 700-800 वारकरी सहभागी आहेत. ही पायी दिंडी दि. 12 जुलै रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असून दि.12 ते 13 जुलै पर्यंत गोंदी व अंबड हद्दीत मुक्कामी राहून दि. 14 जुलै 2023 रोजी गोलापांगरी मार्गे जालना शहराकडे प्रयाण करणार आहे. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. त्याअर्थी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये अपर पोलीस अधीक्षक, जालना शहागड ते अंबड रोडवरील येणारी व जाणारी अवजड वाहनांना दि.12 जुलै रोजी ते दि. 14 जुलै 2023 रोजी दररोज 3 ते 23 वाजेपर्यंत  पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश अपर पोलिस अधिक्षक डॉ.राहूल खाडे यांनी जारी केले आहेत.

या दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असून अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. बदलानूसार  दि. 12 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपासुन ते 23 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरी उड्डानपुलाचे खालून व बाजुने अंबडकडे येणारी अवजड वाहने थांबवुन, ही वाहने पाचोड-अंबड मार्गे जालनाकडे जातील व जालनाकडुन शहागडकडे जाणारी वाहने अंबड- पाचोडमार्गे शहागडकडे जातील.

गुरुवार दि.13 जुलै 2023 रोजी सकाळी 3 वाजेपासुन ते 23 वाजेपावेतो हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरी उडडानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहने थांबवुन, पाचोड जामखेड फाटा- जामखेड- किनगाव चौफुली- बदनापुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडुन येणारी वाहने बदनापुर- किनगाव चौफली- पाचोड मार्गे शहागडकडे जातील. तर शहापुर ते शहागड व अंबड ते पाचोड मार्गावरील गावातील अवजड वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच पारनेर फाटा ते औरंगाबाद हायवे पर्यंतच्या गावातील अवजड वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

 शुक्रवार दि.14 जुलै 2023 रोजी सकाळी 3 वाजेपासुन ते 23 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डानपुलाचे खालून व बाजूने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करुन, ही वाहने वडीगोद्री- पाचोड- जामखेड फाटा- जामखेड- किनगाव चौफुली- बदनापुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडून येणारी वाहने बदनापुर- किनगाव चौफुली- जामखेड- जामखेड फाटा- पाचोड मार्गे शहागडकडे जातील.  तसेच अंबडकडुन जालनाकडे जाणारी अवजड वाहने 3  ते 23  वाजेदरम्यान बंद करुन ही वाहने किनगाव चौफुली- बदनापुर मार्गे जालनाकडे जातील व जालनाकडुन अंबडकडे येणारी अवजड वाहने बदनापुर- किनगाव चौफुली- जामखेड- पाचोड मार्गे शहागडकडे जातील. दि.13 ते दि.14 जुलै ३ रोजी जालनाकडुन घनसावंगीकडे जाणारी वाहने, रोहनवाडी- सुतगिरणी मार्गे घनसावंगीकडे जातील व घनसावंगीकडुन जालनाकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जालनाकडे जातील. घनसावंगी कडुन बिडकडे जाणारी वाहने तिर्थपुरी- गोंदी- शहागड मार्गे बीडकडे जातील. तरी या मार्गावर जड वाहनाच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

No comments:

Post a Comment