Wednesday 26 July 2023

जिल्ह्यातील इतर मागासवर्गीयांनी विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 


जालना, दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाकडून इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. तरी जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या तसेच 18 ते 50 वर्षादरम्यान वय असणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी सन 2023-24 वर्षासाठी ऑनलाईन www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवगी्रय वित्त्‍त आणि विकास मंडळाकडून इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येतात. तरी जिल्ह्यात 20 टक्के बीज भांडवल योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्रकरणासाठी तसेच थेट कर्ज योजना 1 लाख रुपयांसाठी अर्ज विक्री अर्ज संपेपर्यंत चालु राहणार आहे. तरी जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, वयाचा दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्यप्रती अर्ज खरेदी करताना कार्यालयात दाखल करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवगी्रय वित्त्‍त आणि विकास मंडळ मर्यां. , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, जालना येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवगी्रय वित्त्‍त आणि विकास मंडळ, मर्या. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment