Friday 14 July 2023

जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावर उमेदवारांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तलाठी पदाच्या नियुक्ती पत्राचे वितरण · जालना जिल्ह्यातील सेवेचा दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचा सत्कार







जालना, दि. 14 (जिमाका) :- शासकीय सेवेत  असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या 20 टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरण्याचा शासन निर्णय आहे. जालना जिल्ह्यासाठी नव्याने 80 तलाठी साझे निर्मिती करण्यात आले असून शासनाने व विभागीय आयुक्तांनी या तलाठी साझावर 20 टक्के नियुक्ती देण्याचे कळविले आहे. यानुसार आज जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावर एकुण 16 उमेदवारांना तलाठी पदाच्या नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्हा प्रशासनात तलाठी हा ग्रामस्तरावरील  महत्वाचा घटक असून महसूल प्रशासनाचा तो कणा आहे, त्यामुळे नियुक्त झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे उत्तम काम करावे व नागरिकांना चांगली सेवा द्यावी, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवारांना आज नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस अधिक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जालना जिल्ह्यातील सेवेचा दोन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. 

जालना जिल्हा आस्थापनेवरील महसूल गट-क व सामायिक गट-क संवर्ग अनुकंपा प्रतिक्षा यादीतील धनराज पांडूरंग धुमाळ, राजेंद्र एकनाथ पंडित, गणेश पुंडलिक गायकवाड, महमंद हारेस महमंद कमरोद्दीन,  अर्चना भागवत जाधव, अक्षय रविंद्र कुलकर्णी, विशाल सुरेश दळवी, शंकर कोंडिबा दुर्गमवार, आनंद पांडूरंग पंचांगे, विनोद श्रीराम कांबळे, अशोक भानुदास गायकवाड, रुपाली विनोद यादव, विठ्ठल सर्जेराव घुले, रुपाली दिलीप जगदाळे, ज्योती सतिश अवकाळे आणि रंजना रवीकिरण वैद्य या उमेदवारांना नियुक्ती पत्राचे आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांसह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment