Wednesday 5 July 2023

आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


 

            जालना दि. 5 (जिमाका) :- सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतूदीनूसार जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी  जून 2023 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर 1 विवरणपत्र रविवार दि.30जुलै  2023 पुर्वी www.rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालय,‍ अंगिकृत उद्योग / व्यवसाय / महामंडळे,  स्थानिक स्वराज्य संस्था,  जिल्हा परिषद, पंचायतसमिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील  25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे ) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1  माहे जून 2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत म्हणजेच दि.30जुलै 2023 पर्यत सादर करणे बंधनकारक आहे.

 नियोक्त्यांच्या लॉग-इनमध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी याप्रमाणे नियोक्त्यांची जून 2023 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. 30जुलै 2023 पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in  वेबसाईट ओपन करुन, एम्प्लॉयर   (लिस्ट अ जॉब ) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. माहिती भरतेवेळी  काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी  सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी 10  ते सांयकाळी 6 वाजेपर्यत (02482) 299033 या कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क साधावा. तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्यास कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment