जालना, दि. 4 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये
प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी
व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे,
भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी, पाणी बिल,
महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि.
9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये
ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन श्रीमती पी.पी.भारसाकडे-वाघ, सचिव, जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment