Monday 11 September 2023

उत्पादन शुल्क विभागाची पाच महिन्यात भरीव कामगिरी; 288 गुन्हेगारांना अटक तर 44 लाखाचा मुद्देमाल जप्त

 


जालना, दि. 11 (जिमाका) :-  राज्य उत्पादन शुल्क, जालना विभागाने माहे एप्रिल  ते ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये परराज्यातील अवैध दारू तस्करी, अवैध मद्य विक्री तसेच गावठी दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. माहे एप्रिल ते ऑगस्ट 2023 या पाच महिन्यामध्ये एकुण 366 गुन्ह्यांची नोंद केलेली असून सदर गुन्ह्यांमध्ये एकुण 288 आरोपींना अटक केलेली आहे. तसेच या कारवायांमध्ये 4.4155 लिटर हातभट्टी 78.498 लिटर रसायन 585.7 ताडी 1581.8 ब.लि. देशी 241.34 लि. विदेशी मद्य 25 ब.लि.बिअर 13 वाहने जप्त केलेली असून यातून सुमारे 44 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या नोंदविलेल्या गुन्ह्यांचे दोषारोप न्यायालयात सादर केले आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने व  संचालक सुनिल चव्हाण,  विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार व राज्य उत्पादन शुल्क पराग अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 28 ऑगस्ट रोजी माने राहेरा ता. घनसावंगी जि. जालना येथे पपईच्या शेतात घेतलेल्या गांजाच्या पिकावर धाड टाकून अवैधरित्या विनापरवाना गांजाची शेती करणान्या इसमावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून एनडीपीएस कायदा 1985 च्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी इसमाच्या ताब्यातून रु. 2 लाख 18 हजार 520 रुपये  इतका 15.66  कि.लो मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. यापूर्वी देखील राज्य उत्पादन शुल्क, जालना विभागाने जाफ्राबाद परिसरात गांजाच्या शेतावर कारवाई केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिस विभागासोबत कैकाडी मोहल्ला येथे संयुक्त कारवाई करून एकूण 10 नोंद केले आहे. तसेच यामध्ये 220 लिटर गावठी दारु जप्त केली असून 8400 लिटर रसायनाचा जागीच नाश करण्यात आला. सदर कारवाईमध्ये रु.3,00,300 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाने 3 चारचाकी वाहने त्यामध्ये देशी दारू भिंगरी संत्राच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 1488 सिलबंद बाटल्या व विदेशी दारूच्या 180 मि.ली. च्या 432 वाहनासह एकूण रु.6,86,930/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क, जालना विभागाने सराईत गुन्हा 93 अन्वये 65 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये 55000/- बंधपत्र घेण्यात आलेले आहे. तसेच 7 एमपीडीए गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

 

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या धाब्यावर कलम 68 व 84 अन्वये एकुण 8 गुन्हे नोंद करण्यात आले. त्यामध्ये 40 आरोपीना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांच्याकडून रु. 62000/- दंड वसूल केला आहे.वेळोवेळी आठवड्यातून एक दिवशी रात्रीची गस्त घेतली जाते, त्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून अवैधरित्या मद्यसाठा होणार नाही याकडे लक्ष दिले जाते.

जालना जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या सर्व कारवायामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरीक्षक एम. एन. झेंडे, निरीक्षक गणेश पुसे,  तसेच भि.सु. पडूळ,  श्री. चाळणेवार, श्री. दौंड, श्री. टकले, व्ही.पी राठोड, आर.ए. पल्लेवाड,  ए.आर. बिजुले,  व्ही. डी. पवार, एस. जी. कांबळे, व्ही.डी. आंभोरे,  के.बी. काळे तसेच श्रीमती आर. आर. पंडीत आदि अधिकारी-कर्मचारी अवैध मद्य विक्रीला आळा बसावा यासाठी नेहमीच सतर्क असतात. कधी गाडीचा पाठलाग करुन किंवा हात भट्टी व्यवसाय उध्दस्त करण्याच काम मोठे जिकिरीचे असते. काही वेळा अधिकारी-कर्मचाऱ्यांना जीवावर बेतण्याचा प्रसंग घडतो. गेल्या पाच महिन्यातच्या कारवाईत 4415  लि. हातभट्टी. 78498 लि. रसायन, 585.7 ताडी, 25818 ब. लि. देशी मद्य, 241.34 ब.लि विदेशी मद्य, 25 ब.लि. बिअर, 13 वाहने मिळून सुमारे 8.8 लाखांचा मुद्येमाल जप्त केला आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment