Monday 11 September 2023

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना, दि. 11 (जिमाका) --- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय दि. 4 जुलै 2023 व दि. 30 ऑगस्ट 2023 च्या शासन शुद्धीपत्रक अन्वये दि. 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कारासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी शासन निर्णय दि. 4 जुलै 2023 निकषांची पुर्तता करणा-या / करु शकणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी अर्जाचा नमुना (परिशिष्ट ) दि. 4 जुलै 2023 शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट येथे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, पु.ल. देशपांडे 15 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत. जिल्ह्यातील सर्व सहभागी गणेशोत्सव मंडळांमधून जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करण्यात येईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

                                                       -*-*-*-*-

No comments:

Post a Comment