Wednesday 6 March 2024

जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटी पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

 

जालना, दि. 6 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम शिबीर उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी ज्या अर्जदारांनी त्रुटी पुर्तता केली नसेल अशा शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रस्तावातील अर्जदारांनी दि. 11 मार्च 2024 दरम्यान विशेष त्रुटी पूर्तता मोहिमेचा लाभ घेऊन आपले प्रकरण निकाली काढावे, असे आवाहन उपायुक्त वैशाली हिंगे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रकरणांमधील त्रुटी पुर्ततेसाठी जिल्ह्यात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक अभियानांतर्गत विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत अर्जदारांचे शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतरसाठी जात वैधता प्रस्ताव पडताळणीसाठी सादर केले होते. अशा सर्व जातीदाव्या प्रकरणामध्ये समितीस्तरावर प्राथमिक छाननी करुन ज्या प्रकरणामध्ये कागदपत्रे, पुरावे अभावी त्रुटी आहे. अशा प्रकरणामध्ये जातीदावा प्रस्तावात नमूद मोबाईलवर एसएमएस, ई-मेलद्वारे त्रुटी कळविण्यात आली आहे. असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment