Wednesday 6 March 2024

85 वर्षांच्या जेष्ठांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याची संधी दिली आहे. याबाबत भारत सरकारच्यावतीने  दि. 1 मार्च 2024 रोजी राजपत्र जारी करण्यात आले आहे. यापूर्वी 80 वर्षांपुढील मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करता येते होते.

वय वर्ष 85 वर्षांवरील मतदारांना घरुन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या परवानगीसाठी फॉर्म 12-D देण्यात येईल. यानंतर जे मतदार या फॉर्मव्दारे घरुन मतदान करण्यास परवानगी देतील, त्यांना निवडणूक कार्यालयाकडून टपाल मतपत्रिका पोहचत केली जाईल.

जालना जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय वय वर्षे 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 28 हजार 474 आहे. यामध्ये परतूर विधानसभा मतदार संघात 5 हजार 843 मतदार, घनसावंगी-5 हजार 660 मतदार, जालना – 5 हजार 625 मतदार, बदनापूर -  5 हजार 239 मतदार आणि भोकरदन – 6 हजार 107 मतदार संख्या आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.

***

No comments:

Post a Comment