Monday 18 March 2024

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत बैठक संपन्न

 







जालना, दि. 17 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, यांच्यासह विविध राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगून मुद्रीत माध्‍यमातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्‍या दिवशी  किंवा  मतदानाच्‍या एक  दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  घेणे बंधनकारक  आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत त्यांच्या शंकेचे निरसनही केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment