Monday 11 March 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गती शक्ती कार्गो टर्मिनलचे 12 मार्चला दूरदृश्य प्रणालीव्दारे लोकार्पण

 

 

जालना, दि. 11 (जिमाका) :-   जालना शहराजवळील दरेगाव येथील गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनलचे 12 मार्च 2024 रोजी सकाळी 9.15 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

या वेळी दरेगाव येथे आयोजित कार्यक्रमास  केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment