Monday 4 March 2024

नेहरु युवा केंद्रातर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तीर्थपुरी येथे संपन्न

 


        जालना, दि. 4 (जिमाका) :- नेहरू युवा केंद्र, जालना, ड्रिबल स्पोर्टस अकॅडमी, जालना व छत्रपती शाहू महाराज स्पोर्ट्स अॅड एज्युकेशन अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन एस.पी. पाटील इंग्लिश स्कूल तीर्थपूरी येथे करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले क्रीडा क्षेत्र केवळ स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही; तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी.सध्याच्या धकाधकीच्या युगात आपले राहणीमान निष्क्रिय झाले आहे. एकंदरच आयुष्याचा वेग वाढल्यामुळे आपण रोजच्या व्यवहारांसाठी चालत किंवा सायकलवर जाऊ शकलो तरी मोटारगाडी वर अवलंबून राहतो. खेळ, क्रीडा, शारीरिक कष्ट आणि हलन-चलन या नैसर्गिकरित्या केल्या जाणार्या गोष्टी आपल्याला रोजच्या जगण्यातून वेळ काढून आणि ठरवून करायला लागत आहेत. त्यामुळे खेळांसाठी लागणारे शरीर स्वास्थ्य आपल्याला केवळ तो खेळ खेळून मिळणार नसतं. संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा लागणार आहे. असे मार्गदर्शन प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच शाळेच्या परिसरामध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, कब्बडी व रस्सीखेच असे चार सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले व या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सदरील स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंच परमेश्वर रोडे, शरद जाधव, मयूर पिवळ, राजू पारडे, हरीश राठोड, कडुळे सर, खरात सर ड्रिबल स्पोर्टस अकॅडमीचे दिनेश पवार, शुभम यादव व स्वयंसेवकांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment