Wednesday 20 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी

 

 

जालना, दि.20 (जिमाका) :- भारत निवडणुक आयोग यांच्या सुचनेनूसार जालना जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणुक घोषित झाल्यापासून निवडणूक निकाल घोषित होईपर्यत परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्ञ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवडयाच्या आत संबधितांचे शस्ञ परत करण्यात यावेत. सदर आदेश जालना जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासुन दि. 6 जून 2024 पर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

         -*-*-*-*-

 


No comments:

Post a Comment