Monday 3 August 2020

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



            जालना, दि. 3 -  क्रांतिसिंह नाना पाटील यांची  जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, तहसिलदार संतोष बनकर, तहसिलदार प्रशांत पडघन, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, नायब तहसिलदार श्रीमती  मयुरा पेरे, श्रीमती स्नेहा कुहरे, आर.आर. महाजन,  संपदा कुलकर्णी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्रातिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन  यांना अभिवादन केले.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment