Monday 17 August 2020

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

            जालना, दि. 17:-(जि.मा.का.) :-देऊळगाव राजा जि. बुलढाणा येथील खडकपूर्णा प्रकल्पाचे एकूण 19 वक्रव्दारे 30 सेंटीमीटरने  उघडली असून नदीपात्रामध्ये 22550 क्यूसेस 668 cumec एवढा विर्सगाने पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्यासाठी पुढील निर्णय देण्यात येणार असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा अपत्ती व्यवस्थापन जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

             तसेच धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पुर विसर्गाबाबत गांभीर्य लक्षात घेता जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याबरोबरच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदारांना एका पत्राद्वारे दिले आहेत.                                                                            

                                                                        ********

No comments:

Post a Comment