Thursday 13 August 2020

जालना शहरात भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या अँटीजेन तपासणीत 16 पॉझिटिव्ह

 



 

जालना दि,13:- (जि.मा.का.) :- जालना शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी भाजीपाला व फळ विक्रेते यांची रॅपीड अँटीजेन तपासणी   दि. 13 व 14 ऑगस्ट  2020 रोजी अशा दोन दिवस करण्यात येणार आहे. जालना शहरातील कोरोना रुग्णांच्या  संख्येत दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि संशयित रुग्ण निदान लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन रॅपीड अँटीजेन तपासणी आजरोजी भाजीपाला व फळ विक्रेते यांची तपासणी मल्टीपर्पज हायस्कुल येथे 260 जणांची तपासणी केली असता यामध्ये 5 पॉझिटिव्ह , फुलंब्रीकर नाट्यगृह येथे 173 जणांची तपासणी केली असता 11 पॉझिटिव्ह तर जुना मोंढा येथे 116 जणांची तपासणी केली असता येथ एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.  या तीनही ठिकाणी एकुण 549 विक्रेत्यांची अँटीजेन तपासणी  केली असता यात फक्त 16  विक्रेत पॉझिटिव्ह आढळुन आले आहे. ही तपासणी दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी त्याच ठिकाणी घेण्यात येणार आहे. आजरोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अँटीजेन तपासणी सेंटरला भेट देऊन शहरातील सर्व फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले,यावेळी त्यांच्यासोबत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, आरोग्य सभापती  श्रीमती पुजा सपाटे,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी संतोष कडले आदींची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment