Wednesday 12 August 2020

दि. 13 व 14ऑगस्ट भाजीपाला,फळ विक्रेते यांची अँटीजेन तपासणी

 


      जालना दि. 12 (जिमाका) :-जालना शहरामध्ये कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सध्या संशयीत रुग्ण निदान लवकरात लवकर व्हावे या करिता रॅपीड अँटीजेन तपासणी करण्याचे अगत्याचे झाले आहे याचाच एक भाग म्हणुन शहरात असलेले भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते यांचा नागरीकांशी जास्त संपर्क येत असल्याने त्यांची कोरोना अँटीजेन तपासणी रॅपीड किट द्वारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दि. 13 व 14ऑगस्ट या दोन दिवसात पुढील निश्चित केलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असुन सर्व भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते यांनी त्यांची कोरोना विषयक अँटीजेन तपासणी करुन घ्यावी. दि.15 ऑगस्ट पासुन रॅपिड अँटीजेन तपासणी करुन प्रमाणपत्र सोबत ठेवलेल्या फळ व भाजीपाला विक्रेते यांनाच फक्त भाजीपाला व फळे विकता येतील याची नोंद घेण्याचे जिल्हा प्रशासनाद्वारे सर्व फळ व भाजी विक्रेते यांना आवाहन  करण्यात येत की , पुढील नियोजित ठिकाणी तपासणी करुन घेण्यात यावी.

         दि. 13  व 14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4   यावेळेमध्ये  जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळा, नगर परिषद बाजुला जालना, फुलंब्रीकर नाट्यगृह जालना, जुना मोंढा ब्लॉक नं. 4 अर्जुन खोतकर, व्यापारी संकुल जुना मोंढा येथे वेळात्रकानुसार नियोजित ठिकाणी 2000 ते 2500 फळविक्रेते, भाजीविक्रेत यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना  व मुख्याधिकारी नगर परिषद जालना यांच्या मार्फत करण्यात आले आहे.असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे निवृत्ती गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment