Tuesday 18 August 2020

ऑन लाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार, नोकरीची सूवर्णसंधी

 


जालना दि. 18 (जि.मा.का.) :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अंतर्गत दुसरा ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिना19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी  आयोजीत करण्यात आलेला आहे.तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारानी https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून स्वत:चा युझरआयडी व पासवर्ड वापरून पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टबमध्ये अधिसूचित रिक्तपदे तपासून पदाच्या पात्रते प्रमाने या मेळावामध्ये सहभाग नोंदवावा. सदर मेळावा ऑनलाईन होणार असून सदर कंपनीच्या आवश्यकतेनुसार  Skype,Whatsapp, तसेच  व्हीडीओ कॉल व फोनद्वारे मुलाखत घेवून निवड प्रकिया होणार आहे. तरी जास्तीत जास्त बेरोजगारानी रोजगार मेळावा सहभाग नोंदवावा. दुसरा ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवताना काही अडचण आल्यास  (( 02482) 225504 या नबर वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्फत करण्यात येत आहे.                                                      

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment