Saturday 15 August 2020

एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव

 





जालना दि. 15 (जिमाका) :- कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ वीक उपक्रमांतर्गत चौथ्याआठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते हस्ते  रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी जालना अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची उपस्थिती होती.

            यामध्ये उत्कृष्ट डॉक्टर विजय राठोड यांना चार हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिपक खिल्लारे यांना दोन  हजार पाचशे रुपयांचा धनादेश, उत्कृष्ट लॅब टेकनिशियन बाळासाहेब पवार यांना दोन हजार पाचशे रुपयांचा तर उत्कृष्ट परिचर दयानंद वाघमारे यांना एक हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप यांनी दिली. तिस-या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी दिली.चौथ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम अपर जिल्हाधिकारी जालना अंकुश पिनाटे  यांनी दिली.

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment