Wednesday 29 July 2020

जिल्ह्यात 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 33 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


            जालना दि.29 (जिमाका) :- जालना शहरातील  पाणीवेस-1, भाग्यनगर -1, रामनगर-2, पांगारकर नगर -1, जिजामाता कॉलनी -1, लोधीमोहल्ला -1, जालना शहर -1, संभाजीनगर -2, कसबा -9, पुष्पकनगर-1, सिंधी भवन -1,  गणपती गल्ली -1, गोंदी -8, अंबड-1, यावलगाव-1, राममुर्ती-1 अशा एकुण 33  रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील भाग्यनगर-3, जवाहर बाग-1, सुखशांती नगर-1, संभाजीनगर -5, गुरु गोविंदसिंग नगर-1, गांधीचमन -1, भवानीनगर -1, सोनलनगर -1, बु-हाननगर -1, सामान्य रुग्णालय परिसरातील -3, शंकर नगर -2, पांगारकर नगर -6, शिवाजीनगर-3, संजयनगर -1, जे.ई.एस. कॉलेज परिसर -2, सुभाष चौक -1, जुना जालना -1, बिहारीलाल नगर -3, समर्थ नगर -1, अग्रेसन नगर -1, पाणीवेस -1, मोदीखाना-1, करवा नगर -1, आखेरा -1, जालना -2, बालाजी गल्ली परतुर -1, शहागड -1, धोपटेश्वर ता. बदनापूर -1 आझादनगर लोणार जि. बुलढाणा-1 रोहीलागड -2, भांबेरी -2, वाळकेश्वर -1, नाथ्रेकरचौक अंबड -5, म्हाडा कॉलनी भोकरदन-1, अंबड शहर -2, भोकरदन शहर-1, पिरपिंपळगाव -1, कोठी ता. घनसावंगी -1  अशा एकुण 65 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे -4 अशा एकुण 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7139 असुन  सध्या रुग्णालयात-475 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2735, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-228 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-12081 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने69 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2057 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9685,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-439 एकुण प्रलंबित नमुने-250, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 2286
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -15, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2149, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-115, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-580, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-475,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-59, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 33, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1360, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-615 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-17, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-23003 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-65 एवढी आहे.
            सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथील रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 24 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना          दि. 27 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 29जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 580 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-13,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-45, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन, वसतिगृह-17, जे.. एस. मुलांचे वसतिगृह-15,,जे. . एस. मुलींचे वसतिगृह-55, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-17, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-45, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-96, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-66,गुरु गणेश भुवन-18 मॉडेल स्कुल, परतुर-13, केजीबीव्ही, परतुर-2, मॉडेल स्कुल मंठा-13, केजीबीव्ही, मंठा-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-41, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-47, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-5 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी-2, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-13, शासकीय मुलींचे, वसतिगृह, भोकरदन-12, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन-13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1, आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-8, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद – 5.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत -200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1045 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99600,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 38 हजार 330 असा एकुण 8 लाख 64 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*******
             
       

No comments:

Post a Comment