Thursday 16 July 2020

जिल्ह्यात 80 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 12 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती




जालना दि. 15 (जिमाका) :- जालना शहरातील नाथबाबा गल्ली -1, कबाडीपुरा -1, मंगळबाजार -1, काद्राबाद-3 मस्तगड -1, रोहिला गल्ली-1, इतवारा मोहल्ला -1, बुंदेले चौक  -1, सकलेचा नगर -1 ,झाशीची राणी चौक -1  अशा एकूण  12 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  संभाजीनगर -36, लक्कडकोट -6, मस्तगड- 5, पानीवेस -2, हिरखान रोड पानीवेस -2, नेहरु रोड -2, रुख्मिणीनगर -4, पोलास गल्ली - 3, पुष्पकनगर- 3, तट्टुपुरा  - 1, आनंदी स्वामी गल्ली -1 नाला जालना – 1, खडकपुरा -1, मोदीखाना -1, संजयनगर -1, मित्तलनगर- 1, दु:खीनगर -1, गोकुळविहार -1, अंबर हॉटेल परिसर -1, कालीकुर्ती -1, लक्ष्मीनगर -1 बु-हाणनगर-1 निलम नगर -1, सत्यनारायण नगर चंदनझिरा -1, शंकर नगर -1, सिध्दीविनायक नगर -1, अशा एकुण 80 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण 5635 असुन  सध्या रुग्णालयात - 327 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2219, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या410 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-8660, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने80 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1182 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -6486,रिजेक्टेड नमुने -35, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या - 421 एकुण प्रलंबित नमुने- 957,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1841.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती20, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1617 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -70, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -522, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 327,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 2, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-12, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-727, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-369 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-35, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17192,तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 51 एवढी आहे. 
     जालना शहरातील मित्‍तलनगर परिसरातील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा, उच्च रक्तदाब,  मधुमेह व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 16 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 16 जुलै 2020 रोजी पहाटे  3.40 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला तसेच   जालना शहरातील दु:खीनगर परिसरातील     रहिवासी असलेल्या 44 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 16 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 14 जुलै 2020 रोजी  त्यांचा मृत्यु झाला. 
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 522 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 10, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना - 30,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -64, गुरु गणेश भवन -12, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 49, जे. . एस. मुलींचे वसतिगृह - 53, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 1, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 26, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 107,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 54,  मॉडेल स्कुल मंठा - 8, केजीबीव्ही परतुर -7, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -5, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-32,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-10 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -6,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-12, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -5.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -990  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 6 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99  हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   5 लाख 81 हजार 830 असा  एकुण 7 लाख   8 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment