Thursday 23 July 2020

जिल्ह्यात 31व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 45 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



         जालना दि. 23 (जिमाका) :- जालना शहरातील  संभाजीनगर -16, काद्राबाद-5, कुंभार गल्ली-1, रामनगर -5, लक्कडकोट-2, गोपालनगर-1, मस्तगड-3,चंदनझिरा-1, तट्टुपुरा -1, मोदीखाना  -2, बसस्थानक परिसरातील -2, कन्हैयानगर -1, पंचशील दवाखाना परिसर -4, रहेमान गंज -1 अशा एकूण  45 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील जालना शहर -2, कचेरी रोड -2, भाग्यनगर-1, मस्तगड -3, पांगारकर नगर-6, शहागड-5, साष्ट पिंपळगाव -8, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद -1, चिंचखेडा-1, पोलीस स्टेशन, आष्टी -2, अशा एकुण 31 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण6525 असुन  सध्या रुग्णालयात–523 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2573, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या92, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या - 9746, एवढी आहे.  प्रयोगशाळेकडून अनिर्णीत नमुने-9, दैनिक पॉझिटीव्ह नमुने31  असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -1579 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -7741,रिजेक्टेड नमुने -39,  पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या - 424 एकुण प्रलंबित नमुने- 378,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 2032
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती67, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1916 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-807, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-30, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-523,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 96, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-45, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-985, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-496 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-40, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-20306, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या  58 एवढी आहे.
            जालना शहरातील आर. पी. रोड परिसरातील रहिवासी असलेले 74 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास असल्यामुळे त्यांना दि.17 जुलै 2020 रोजी  सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना         दि. 20 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु  असतानाच त्यांचा दि. 22 जुलै 2020 रोजी पहाटे 3.15 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला. तसेच जालना शहरातील  गौतम नगर  परिसरातील रहिवासी असलेल्या 75 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा व मेंदुतील रक्तवाहिनीच्या दोषाचा  त्रास असल्यामुळे त्यांना दि.8 जुलै 2020 रोजी  सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 17 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा दि. 22 जुलै 2020 रोजी रात्री 10.20 मिनिटांनी मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 807 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-102, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-31,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -166,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 63, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह-48, जे. . एस. मुलांचे वसतिगृह-49, जे. . एस. मुलींचे वसतिगृह-54, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-56, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-61, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 6, केजीबीव्ही परतुर -02, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -07, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-27,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-27, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी - 07,  शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-3,शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-60,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन-23,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -8, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -7.
        लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत असुन 192 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 1026 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 880 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड - 99  हजार 600,  मुद्देमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   6 लाख 30 हजार 330 असा एकुण 7 लाख 56 हजार 938 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-



No comments:

Post a Comment