Thursday 2 July 2020

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा




        जालना, दि. 2 – गोदावरी नदीवर पैठण धरणातील आपेगाव, हिरपुडी ता. पैठण, जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी (शिवनगाव) ता. घनसावंगी आणि लोणीसावंगी ता. परतुर हे सहा उच्चपातळी बंधारे आहेत. सद्यस्थितीत काही बंधाऱ्यांमध्ये 70-75 टक्के पाणीसाठा झाला आहे.  जर पाणलोट क्षेत्रामध्ये जोराचा पाऊस होऊन Flash Flood झाल्यास अंत्यंत कमी कालावधीत बंधारा 90 टक्यावर जाऊन त्यावेळेस पाण्याचा विसर्ग हा निम्नबाजुस दरवाजे उचलुन बाहेर सोडावा लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जायकवाडी विभाग, पैठण यांनी कळविले आहे. त्यानुसार नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क रहावे, चलमालमत्ता, चीजवस्तु, वाहने, जनावरे, पाळीवप्राणी, शेती अवजारे आदी साधनसामग्री सुरक्षितस्थळी हलविण्यात यावी.  तसेच धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पुर विसर्गाबाबत गांभीर्य लक्षत घेता जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्याबरोबरच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी संबंधित क्षेत्रातील उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदारांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
*******



No comments:

Post a Comment